बदलत्या वातावरणामुळे आणि हवेमुळे अनेक प्रकारचे हानिकारक बेक्टेरिया आणि व्हायरस
आपल्या श्वासाच्या सोबत शरीरात प्रवेश करतात.
जेंव्हा आपली इम्युनिटी कमजोर होते तेंव्हा हवे मध्ये असलेले व्हायरस आपल्या शरीरात वाढतात, ज्यामुळे सर्दी -खोकला आणि अलेर्जी या समस्या होतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती यापासून आपला बचाव करते. रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे शरीरात बाहेरून प्रवेश करणाऱ्या विषाणु किंवा अन्य कोणत्याही गोष्टींना प्रतिकार करण्याची शरीरांतर्गत क्षमता शरीरावर आघात करणाऱ्या या विषाणूंना शरीरात आधीच असलेल्या पेशी निष्प्रभ करतात. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी नियमित व्यायामासह आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश असावा. आपली प्रतिकारक शक्ती मजबूत असल्यास आपल्याला संसर्गाचा धोका कमी होतो. पौष्टिक आहार न घेतल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि आपण आजारांना बळी पडतो. रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्यासाठी बरेच नेसर्गिक पदार्थ आहेत,
त्यासाठी आपल्या आहारात अँटीबॅक्टरील आणि अँटिव्हयरल फूडचा समावेश करणे फार महत्वाचे आहे.
नॆसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय :
१) व्हिटॅमिन सी युक्त फळे
संक्रमित रोगांपासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन सी च सेवन करणे फार फायदेशीर ठरते. लिंबू , आवळा , संत्री यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतात. त्यामुळे नियमित व्हिटॅमिन सी युक्त फळे खावीत. व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे असते त्यामुळे वेगवेगळ्या रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. सोबतच हाडेही मजबूत होतात. आणि हृदयसंबंधी आजारही दूर राहतात. त्यामुळे व्हिटॅमिन डी घेणं गरजेचे आहे.
i)
आवळा
शरीरास पोषक असणाऱ्या
अनेक फळांपैकी एक आरोग्यवर्धक फळ म्हणजे आवळा. आकारानं छोट्या असलेल्या या फळामुळे
शरीर शुद्ध (Detox) होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. छोट्या-मोठ्या आजारांची
सहज लागण होणे म्हणजे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय कमकुवत असणे. नियमित स्वरुपात आवळ्याच्या रसाचे सेवन करा म्हणजे इम्युनिटी वाढण्यास मदत होईल.
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींना बूस्ट करण्याचे कार्य करते. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पांढऱ्या रक्त पेशींवरच अवलंबून असते. यामुळे शरीरामध्ये या पेशी पुरेशा प्रमाणात असणं आवश्यक आहे. निरोगी आरोग्यासाठी आवळा चूर्णाचे मधासह सेवन
करावे.
ii)
संत्री आणि मोसंबी
संत्री - मोसंबी हे अत्यंत गुणकारी फळ आहे. मोसंबीमुळे
रोग
प्रतिकार
क्षमता
वाढते.
मोसंबीमध्ये विटामीन
सी
मुबलक
प्रमाणात
असल्याने शरिरातील
अशक्तपणा
दूर
होतो. आणि
शरिरातील
शक्ती
वाढवण्यासाठी
मोसंबीचा
ज्यूस
फायदेशीर
आहे.
मोसंबीमध्ये
पॅक्टीन
आणि
विटामीन
सी
सोबतच
इतर
पोषक
तत्व
सुद्धा
असतात.
संत्री
आणि
मोसंबी
फळांमध्ये व्हिटॅमिन
सी
असल्याने
अँटिऑक्सिडंट्स
चा
एक
उत्तम
स्रोत
मानल्या
जातात,
त्यामुळे
शरीरात
कोलेस्ट्रॉलची
मात्रा
कमी
करण्यासाठी
मदत
होते.
iii) लिंबू
लिंबू
एक बहुगुणी आणि औषधी फळ आहे. लिंबामधील सी- व्हिटॅमिन्समुळे अनेक रोगांचे निवारण होते.
फक्त लिंबूच नाहीतर लिंबाचा रस, लिंबाची साल हे सुद्धा आरोग्यासाठी आणि विविध सौदर्य
उपचारांवर देखील गुणकारी आहे. लिंबामधील अॅंटी बॅक्टेरिअल आणि अॅंटी ऑक्सिडंट गुणधर्म
रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. नैसर्गिक अॅंटीसेप्टिक गुणधर्मांमुळे लिंबू त्वचा समस्यांवर फारच गुणकारी ठरते.
२) औषधी काढा किंवा चहा
नेसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी औषधी काढा किंवा चहा फायदेशीर ठरतो. तुळस, अद्रक, दालचिनी किंवा मिरे आणि हळद यांपासून बनविलेला काढामध्ये नेसर्गिक औषधी गुणधर्म असतात. अद्रक आणि गवती चहा यापासून बनविलेला चहा आरोगयदायी ठरतो. काढा आणि चहा सामान्य सर्दी, खोकला, आणि अन्य आजारांवर एक घरगुती आणि गुणकारी उपाय आहे. तुळस आणि हळद यामध्ये अँटीबॅक्टरील आणि अँटीइंफ्लामेट्री गुणधर्म असतात जे जिवाणू विरोधी प्रतिकारक असतात.
तसेच घशातील खवखवीवर अतिशय उपयुक्त ठरतात.
३) व्हिटामिन डी
‘जीवनसत्त्व
ड’युक्त पदार्थांचं
सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते. सूर्य हा ‘व्हिटॅमिन डी’चा मुख्य स्त्रोत मानला जातो. सकाळच्या कोवळ्या उन्हातून शरीराला व्हिटॅमिन डी मिळते. कोवळी उन्हे अंगावर घेतल्यास शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि संसर्गाचा धोका कमी होतो. व्हिटॅमिन डी
साठी तुम्ही आहारात मासे आणि दुधाचाही समावेश करू शकता. याव्यतिरिक्त फोर्टीफाइड फुडच्या (या पदार्थांमध्ये स्वतंत्र स्वरुपात व्हिटॅमिन डीचा समावेश केला जातो) माध्यमातूनही तुम्ही व्हिटॅमिन डीचं सेवन करू शकता.
४) लसूण
शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कच्चा लसून औषधाचे काम करते. लसून मध्ये विटामिन ए, सल्फर आणि जिंक असते जे रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असते. लसूण मध्ये गंधकाचे प्रमाण जास्त असते, म्हणूनच त्यात औषधी गुणधर्म असतात. लसणातिल अँटिऑक्सिडंट आतड्यातील जंतू संसर्गावर गुणकारी ठरतात. दररोज दोन लसूण कुड्या खाल्याने लाभ मिळतात. आहारात लसणाचा सातत्याने वापर केल्यास कर्करोगाची शक्यता कमी होते. कारण लसूण कर्करोगाच्या पेशींना वाढू देत नाही.
अॅन्टीऑक्सिडंट म्हणून लसूण सेवन आवश्यक आहे.
५) हिरव्या
पालेभाज्या
रोगप्रतिकारक
क्षमता वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या सर्वोत्तम मानल्या जातात. पालक मध्ये फोलिक एसिड असते, जे शरीरात नवीन सेल्स बनवण्यासाठी आणि जुने सेल्स चांगले करण्यासाठी उपयोगी आहे. पालक मध्ये फाइबर, आयरन एंटीऑक्सीडेंट आणि विटामिन सी पण असते जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.
ब्रोकली मध्ये विटामिन सी आणि ए असते ज्यामुळे इम्युनिटी पावर वाढते. सोबतच बॉडीला प्रोटीन आणि कैल्शियम मिळते. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मशरूम खाणे देखील फायदेशीर ठरते.
६)
हळद
हळद हे कर्करोग, मधुमेह इत्यादी आजारांवर एक नेसर्गिक
उपाय आहे. हळदीचा नैसर्गिक अँटिसेप्टिक गुणधर्म तिच्यातल्या करकुमीन या घटकामुळे असतो. याच घटकामुळे हळदीला पिवळा रंग येतो आणि त्याचे औषधी गुणधर्म वृद्धिंगत होतात. आपल्या खाण्यामध्ये आणि स्वयंपाकामध्ये हळदीचा वापर कित्येक शतकांपासून केला जात आहे. अँटिसेप्टिकशिवाय हळदीत अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे हळद त्वचेसाठी उपयुक्त आहे.







3 comments:
Really informative post to increase our immune system
Keep it up
And tysm 👌🏻👍🏻
Very useful information madam..
And now it is essential information for us building immunity naturally😊
Thank you.
Post a Comment