शुन्य एनर्जी शीतगृह म्हणजे काय?
"शुन्य एनर्जी शीतगृह" (ZECCs) हां बाष्पीभवन शीतगृहाचा एक प्रकार आहे , जो विजेचा वापर न करता फळे आणि भाजीपाला ताजे ठेवण्यासाठी मुख्यता शेतकर्याकरीता एक सोपा आणि स्वस्त मार्ग आहेत. हे शीतगृह फळे व भाजीपालातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन उष्णता काढून टाकते आणि थंड प्रभाव निर्माण करते, ज्यामुळे भाजीपाल्याची साठवण क्षमता सुधारते.
कमी तापमानाला आणि योग्य त्या आद्र्तेला ठेऊन फळांचे आयुष्य दुपटी-तिपटीने वाढवता येते. हि पध्दत सर्वसामान्य शेतकऱ्याला कमीतकमी खर्चात, सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तू पासून आणि उत्पादकांच्या सेडवर त्यांना स्वतःला बांधता येणाऱ्या शीतकक्षाचा वापर फळांच्या साठवणीसाठी करता येतो.
फळांची
शीतगृहातील साठवण :-
फळांची काढणी / तोडणी झाल्या नंतर फळांमधील काही जैविक आणि रासायनिक
क्रिया वातावरणाच्या तापमानाशी संबंधित असतात, म्हणून फळे कमी तापमानाला आणि योग्य
त्या आद्रतेला साठविलयास फळामधील अशा जैवरासायनिक क्रियाचा वेग कमी होतो व फळांची
किंवा भाजीपाल्यांची आयुष्य वाढण्यास मदत होते. कमी तापमानाच्या फळांच्या
साठवाणीला शीतगृहातील साठवण असे म्हणतात.
फळांच्या शीतगृहातील साठवणीसाठी तापमान आणि आद्रता
|
फळे |
तापमान (अंश सेल्सिअस) |
आद्रता |
साठवणीतील आयुष्य (दिवसांत) |
|
हिरवी केळी |
१४ |
८५-९० |
२५ |
|
पिकलेली केळी |
१३ |
८५-९० |
०८ |
|
संत्री |
६ |
८५-९० |
३५ |
|
मोसंबी |
६ |
८५-९० |
३५ |
|
पेरू |
९ |
८५-९० |
५५ |
|
आंबा |
१० |
८५-९० |
३५ |
|
अननस |
९ |
८५-९० |
३५ |
|
डाळिंब |
८ |
८५-९० |
७५ |
बरीच फळे उदाहरणार्थ आवळा, सीताफळ, जांभूळ, पेरू इत्यादी फळे काही
वेळा बाजारामध्ये अत्यंत स्वस्त दराने विकले जातात. त्यामुळे शीतगृहातील महागडी
साठवण उत्पादकाला आणि ग्राहकालासुधा परवडणारी नसते.
भांडवल आणि व्यवस्थापनाचा अनुभव या दोन्ही हि गोष्टीची माहिती
शेतकऱ्यास नसल्यामुळे शीतगृहाची यशस्वीरित्या उभारणी त्यांना वैयत्कीकरित्या जमत
नाही.
बऱ्याच उष्ण कटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधीय फळांना शीतगृहातील साठवण
सहन होत नाही. शीतगृहातील साठवणीमधे त्यांना इजा होईन त्यांची नासाडी होऊ शकते.
फळांच्या
साठवणीसाठी शीतगृह:-
नवी दिल्लीच्या भारतीय कृषी अनुसंधान संस्थेतील उद्यानविध्या
विभागातील निवृत्त शात्रज्ञ डॉ. सुशांतकुमार रॉय यांनी बाष्पीभवनाने थंडपणा या
नैसर्गिक तत्वावर आधारित शीतकक्षाची उभारणी केली आहे. या प्रकारच्या शीतकक्षात
कुठल्याही प्रकारच्या उर्जेचा वापर केला जात नाही. या कक्षाची उभारणी स्वस्त आणि
सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर करून केली जाते. हा कक्ष कुठही उभारला जाऊ
शकतो. म्हणून या शीतकक्षाचा वापर शेतकरी बंधूनी केल्यास जास्त उपयुक्त ठरेल.
शीतकक्ष
उभारणी साठी लागणाऱ्या वस्तू :-
हा शीतकक्ष उभारणी साठी विटा, नदीच्या पत्राची बारीक वाळू, बांबू,
वळलेल गवत, सुतळी इत्यादी वस्तूची अवश्यकता असते व या वस्तू कोठेही उपलब्ध होऊ
शकतात. हा कक्ष भिजवण्या साठी विहिरीचे, किंवा इतर कोणत्याही पाण्याच्या
स्त्रोताचा उपयोग करणे.
शीतकक्षाचा
अराखडा आणि उभारणी :-
शीतकक्षाच्या तळाचीजागा विटांचा एक थर देऊन रचलेली असते व याच्या
भिंती विटांचे थर देऊन व दोन विटांच्या भिंती मधे ३ इंच एवढी मोकळी जागा सोडून
रचल्या जातात. या दोन विटांच्या भिंती मधे बारीक वाळू भरलेली असते. या कक्षावर
ठेवण्यासाठी / झाकण्यासाठी वापरले जाणारे छत हे बांबूच्या आधार घेऊन वाळा तयार
केले जाते. हे उपलब्ध न झाल्यास झाकण्यासाठी नारळाच्या झावळ्यांचा वापर करावा. हा
कक्ष उभारण्यासाठी निवडलेली जागा हि सावलीखाली असावी व तेथे चांगल्या पाण्याचा सतत
पुरवठा असला पाहिजे. शीतकक्षाची उभारणी शक्यतो शेडखाली करावी. हे शक्य नसल्यास
शीतकक्ष एखादया मोठया झाडाच्या सावलीत तयार करावा.
या शीतकक्षा साठी लागणारा खर्चही हा खूप कमी आहे आणि त्याला लागणाऱ्या
वस्तू ह्या सुद्धा कुठेही उपलब्ध असणाऱ्या आहेत.
|
|
|
|
शीतकक्षाचे
कार्य :-
शीतकक्षाचि उभारणी केल्यानंतर त्याच्या भिंती, तळाची जागा, विटांच्या
दोन भिंतीमधील मोकळ्या जागेत भरलेली वाळू व छते हे सर्व पाणी शिंपडून पूर्णपणे
भिजवून घ्यावे. फळे व भाज्या शीतकक्षात साठविण्यास ठेवण्यापूर्वी तो पूर्णपणे
भिजलेला असावा. तो रोज संध्याकाळी व सकाळी भिजून घ्यावा. यामुळे फळे व भाज्या
साठविण्यासाठी योग्य तापमान व आद्रता त्यामध्ये टिकवून ठेवली जाते. पाणी
देण्यासाठी ठिबक सिंचनाच्या संचाचाही वापर केला जातो.
शीतकक्षाचे
इतर फायदे :-
१)
शीतकक्षातील साठवणी दरम्यान फुले ताजी, टवटवीत
आणि आकर्षक राहतात.
२)
वनस्पतीच्या अभिवृद्धीसाठी लागणारे वनस्पतीचे भाग
शीतकक्षात न सुकता उत्तम राहतात.
३)
शीतकक्षात अंड्यांची साठवण चांगल्या प्रकारे
होते, असे बऱ्याच शेतकरी बांधून कडून समजते.
शीतकक्षाची
घ्यावयाची काळजी :-
१)
शीतकक्षासाठी वापरण्यात येणाऱ्या विटा या अखंड
असाव्यात. तुटलेल्या विटांचा शक्यतो वापर करू नये.
२)
विटांच्या दोन भिंती मधे भरली जनरी वाळू हि बारीक
असावी व वाळूमध्ये मातीचे कण नसावेत.
३)
शीतकक्षावर झाकण्यासाठी तयार केलेल्या छताला
छीद्र नसावीत व ते छत सहज झाकत्ता व उचलता यावे.
४)
शीतकक्षावर सूर्याची किरणे पडू नयेत म्हणून तो
सावलीत बांधावा.
५)
शीतकक्षाची उभारणी पाण्याचा सतत पुरवठा होईल
अश्या जागी करावी. तसेच पाणी साचून राहणार नाही अशी जागा शीतकक्षाच्या उभारणीसाठी
निवडावी.
६)
शीतकक्षाच्या आतील भाग कायम स्वच्छ ठेवाव.
कुजलेली फळे भाज्या त्यामध्ये ठेऊ नये.
फळांची नासाडी थांबविणे, ग्राहकाला ती दीर्घ काळ उपलब्द करून देणे,
तसेच मालाची अचानक आवक वाढल्याने भाव कोसळणे या कारणांमुळे फळांची साठवण करावी
लागते. काही अंतर्गत जैविक आणि रासायनिक क्रियांचा वेग कमी तापमानाला मंदावतो.
म्हणून फळांची शीतगृहात साठवण करावी लागते. परंतु शीतगृहातील हि साठवण अत्यंत
महागडी असल्याने उत्पादकांनी कमी खर्चात सहज बांधता येणाऱ्या शीतकक्षाचा वापर
फळांच्या साठवणी साठी करावा. शीतकक्षातील साठवणी मुले फळांचे बरेच आयुष वाढते. आणि
फळांची होणारी नासाडी टाळू क्षकते. आणि शेतकरी बंधू सुद्धा नुकसान पासून वाचतो.
|
शशी तुकाराम
हिंगाडे (साहायक
प्राध्यापक)
आदित्य अन्नतंत्र
महाविद्यालय, बीड मो.न.:-
९८८१२२२१०२ Mail Id:-
dev.hingade09@gmail.com |
बालाजी
शाहूराज मेटे (साहायक
प्राध्यापक) के. एस.के.
अन्नतंत्र
महाविद्यालय, बीड मो.न.:- ९५२७८५३१५३ Mail
Id:-metebalajee@gmail.com |
1 comment:
शेतकर्यासाठी फायदेशीर आणि स्वस्त शीतगृह
उत्तम लेख धन्यवाद. 🙏
Post a Comment