केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PM FME) Formalization of Micro Food Processing Enterprises Scheme
केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PM FME) ही केंद्र पुरस्कृत योजना एक जिल्हा एक उत्पादन (ODOP-One District One Product) या आधारावर राबविली जाणार आहे. सदर योजनेंतर्गत स्थानिक उत्पादनांना (Vocal for Local) प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
योजनेचा उद्देश :-
- . सध्या कार्यरत असलेले व नवीन स्थापित होणारे वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट/संस्था/ कंपनी स्वयं सहाय्यता गट व सहकारी उत्पादक संस्था यांची पतमर्यादा वाढविणे.
- उत्पादनांचे बॅन्डींग व विपणन अधिक बळकट करुन त्यांना संघटीत अशा पुरवठा साखळीशी जोडणे.
- महाराष्ट्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणण्यासाठी सहाय्य करणे.
- सामाईक सेवा जसे की साठवणुक प्रक्रिया सुविधा, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे.
- अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देणे.
- सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांनी व्यावसायिक व तांत्रिक सहाय्याचा अधिकाधिक लाभघ्सायाठी प्रयत्न करणे.
समाविष्ट जिल्हे :
महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्हे (मुंबई शहर व मुंबई उपनगर समाविष्ट)
पत्र लाभार्ती :-
अ) वैयक्तिक
लाभार्थी
वैयक्तिक लाभार्थी
भागीदारी संस्था, बेरोजगार युवक, महिला, प्रगतशील शेतकरी, मर्यादित भागिदारी संस्था (LLP) इत्यादी
१. उद्योगामध्ये १०
पेक्षा कमी कामगार कार्यरत असावेत.
२. अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार
(प्रोप्रायटरी / भागीदारी) असावा.
३. अर्जदाराचे वय किमान
१८ वर्षे व शिक्षण किमान आठवी पास असावे. एका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल.
४. सदर उद्योगाला औपचारिक दर्जा प्राप्त करून देण्याची तयारी असावी.
५. पात्र प्रकल्प किमतीच्या किमान १० - ४०% लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बँक मुदत कर्ज घेण्याची तयारी असावी.
ब) गट लाभार्थी
शेतकरी उत्पादक गट/कंपनी/संस्था/, स्वयं सहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्था इत्यादी
- भाडवली गुंतवणूक प्रकल्पांसाठी निकष
१. एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) धोरणानुसार निवडलेल्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये कार्यरत शेतकरी उत्पादक गट/कंपनी/संस्था/स्वयं सहाय्यता गट/उत्पादक सहकारी संस्था यांचे नवीन उद्योगांना प्राधान्य दिले जाईल. तसेच NON-ODOP उत्पादनांना देखील लाभ देय आहे.
२. शेतकरी उत्पादक संस्था / कंपनी/सहकारी उत्पादक यांची उलाढाल ही किमान रु. १ कोटी असावी.
३. शेतकरी उत्पादक गट/ कंपनी / संस्था / स्वयं सहाय्यता गट / उत्पादक सहकारी संस्था यांच्या सध्याच्या आर्थिक उलाढालीपेक्षा अधिक किंमतीचा प्रस्ताव असू नये.
४. शेतकरी उत्पादक गट/ कंपनी/संस्था/ स्वयं सहाय्यता गट / उत्पादक सहकारी संस्था यांच्या सभासदांना हाताळल्या जाणाऱ्या उत्पादनाबाबत पुरेसे ज्ञान व अनुभव असावा, तसेच सदर उत्पादनाच्या बाबतीतील किमान ३ वर्षांचा अनुभव असावा.
५. प्रकल्प किंमत व खेळत्या भांडवलासाठी कमीत कमी १०% आणि जास्तीत जास्त ४०% स्वनिधी भरण्यासाठीची तरतूद शेतकरी उत्पादक गट/कंपनी/संस्था/स्वयं सहाय्यता गट / उत्पादक सहकारी संस्था यांची असावी किंवा सदर रक्कम राज्य शासनाच्या योजनेमधून मंजूर असावी.
क) पात्र प्रकल्प
नाशवंत शेतीमाल जसे फळे व भाजीपाला, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, मत्स्योत्पादन, मसाला पिके, दुग्ध व पशु उत्पादन, किरकोळ वन उत्पादने इ. मध्ये सद्यस्थितीत ODOP / | Non-ODOP उत्पादनांमध्ये कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे स्तरवृद्धी / विस्तारीकरण / आधुनिकीकरण या लाभासाठी पात्र असतील नविन स्थापित होणारे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग केवळ ODOP उत्पादनांमधील असावेत.
ड) आर्थिक मापदंड
१. वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५% जास्तीत जास्त रु. १०.०० लाखाच्या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे. त्याकरिता www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावरील PM FME MIS PORTAL वर Online अर्ज सादर करावे.
२. शेतकरी उत्पादक गट/संस्था/ कंपनी, स्वयं सहाय्यता गट/उत्पादक सहकारी संस्था यांना सामान्य पायाभुत सुविधा व भांडवली गुंतवणुक इ. करिता बँक कर्जाशी निगडीत एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या ३५% अनुदान देय आहे. याकरिता कमाल आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून विहीत करण्यात येईल. त्याकरिता www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावरील PM FME MISPORTAL वर Online अर्ज सादर करावे.
३. ग्रामीण आणि शहरी भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये कार्यरत स्वयं सहाय्यता गटातील सदस्यांना खेळते भांडवल व छोटी मशिनरी घेण्याकरीता प्रति सदस्य रु. ४०,०००/- बीज भांडवल रक्कम देण्यात येत आहे. तसेच स्वयं सहाय्यता गटाच्या वैयक्तिक सदस्यास भांडवली गुंतवणुकी करता पात्र प्रकल्प किमतीच्या ३५% व जास्तीत जास्त १० लाखाच्या मर्यादित बँक कर्जाशी निगडीत अनुदान दिले जाईल.
४. ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता गटातील सदस्यांना द्यावयाचे लाभ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) यांचे मार्फत राबविले जातात. त्यासाठी www.nrim.gov.in या संकेत स्थळावरील NRLM पोर्टल वर ऑनलाईन अर्ज सादर करावे तसेच शहरी भागातील स्वयं सहाय्यता गटातील सदस्यांना द्यावयाचे लाभ महाराष्ट्र राज्य शहरी जीवनोन्नती अभियान (MSULM) यांचे मार्फत राबविले जातात. त्यासाठी www.nulm.gov.in या संकेत स्थळावरील NULM पोर्टल वर ऑनलाईन अर्ज सादर करावे.
५. सामाईक पायाभूत सुविधांसाठी सहाय्य (कॉमन फॅसिलीटी सेंटर) : शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी, शासन यंत्रणा किंवा खाजगी उद्योग यांना सामाईक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी बँक कर्जाशी निगडीत ३५% अनुदान देय असेल अशा प्रकरणांमध्ये निधीची कमाल मर्यादा केंद्राकडून विहीत करण्यात येईल.
योजने अंतर्गत सहाय्यासाठीच्या सामाईक पायाभूत सुविधा प्रकार :
अ) कृषि उत्पादनाची वर्गवारी, प्रतवारी, साठवणूक करण्यासाठी जागा व इमारत तसेच शेती क्षेत्राच्या जवळ शीतगृहाची उभारणी,
आ) एक जिल्हा एक उत्पादन धोरणानुसार निश्चित केलेल्या उत्पादनाच्या प्रक्रियेसाठी सामाईक प्रक्रिया सुविधा.
इ)
विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध असणारे केंद्र (इनक्युबेशन सेंटर)
या केंद्रामध्ये एका
किंवा समान पध्दतीच्या अनेक उत्पादनांची हाताळली केली जाईल, लहान युनिट्सना भाडेतत्वावर या केंद्राचा वापर
त्यांच्या उत्पादनाची प्रक्रिया करण्यासाठी करता येईल. तसेच या केंद्राचा वापर
काही प्रमाणात प्रशिक्षणासाठी
होईल. हे केंद्र व्यावसायिक
तत्वावर चालविले जाईल.
v इनक्युबेशन केंद्र - आर्थिक
मापदंड
|
शासकीय संस्था |
खाजगी संस्था |
आदिवासी
क्षेत्रातील खाजगी संस्था, उत्तर-पूर्व राज्ये व मागास जाती जमाती प्रवर्गासाठी |
|
या योजनेअंतर्गत
१००% निधी दिला जाईल |
५0% निधी योजनेंतर्गत दिला जाईल व उर्वरीत रक्कम खाजगी
संस्थेची असेल |
६०% निधी
योजनेंतर्गत दिला जाईल व उर्वरित रक्कम खाजगी संस्थेची असेल. |
६.
ब्रँडींग व मार्केटींगचे आर्थिक मापदंड
ब्रेडींग व
मार्केटींगच्या दृष्टीने सहाय्य करण्यासाठी उत्पादनाचे सामाईक ब्रँड व सामाईक | पॅकेजिंग निर्माण करणे व उत्पादनाचे प्रमाणीकरण करुन
उत्पादित मालाची विक्री करणे, बँडींग व पॅकेजिंगसाठी
एकूण खर्चाच्या ५०% रक्कम सहाय्य म्हणून देय राहिल. यासाठीची कमाल निधी मर्यादा
केंद्र शासनाकडून ठरविणेत येईल.
PM FME अंतर्गत समाविष्ट जिल्हे व त्यांचे एक जिल्हा - एक उत्पादन (ODOP) आणि उत्पादने
|
अ.
क्र. |
|
एक
जिल्हा एक उत्पादक (ODOP) |
उत्पादने |
|
१. |
मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड |
सागरी उत्पादने – मत्स्य |
मासे लोणचे, सुकवलेले मासे, डबाबंद मासे, खारवलेले मासे, गोठवलेले मासे, चिप्स, वेफर्स,पापड, फिश Popcorn, नगेट्स, टिक्की, समोसा,पकोडा इत्यादी. |
|
२. |
ठाणे, नंदूरबार, सोलापूर |
पौष्टिक तृणधान्ये
आधारीत उत्पादने कुकीज, नाचणी सत्व इत्यादी. (नाचणी, भगर, ज्वारी, गहू इत्यादी) |
पीठ, पापड, बिस्कीटे, माल्ट, फ्लेक्स, स्टार्च, |
|
३. |
पालघर |
चिकू |
स्क्वॅश, पल्प, जाम, जेली. नेक्टर, स्लाईसेस, आईस्क्रीम, कँडी, पावडर, ज्यूस इत्यादी. |
|
४. |
रत्नागिरी, सिंधुदुर्ग |
आंबा |
पल्प, जाम, जेली, मुरंबा, स्क्वॅश, नेक्टर, कोकटेल, स्लाईसेस, आईसक्रिम, ड्राइड स्लाईसेस, डबाबंद, ज्यूस, गोठवलेले, लोणचे, चटणी इत्यादी. |
|
५. |
धुळे, जळगाव |
केळी |
चिप्स, प्यूरी, पल्प, पावडर, वेफर्स,
Concentrate, Figs, Flour, फ्रोझन स्लायसेस व डायसेस, जाम इत्यादी. |
|
६. |
नाशिक |
कांदा |
फ्राईड कांदा, Dehydrated Onion Flakes, पेस्ट, पावडर,
Strips, ऑईल, सॉस, लोणचे इत्यादी. |
|
७. |
पुणे, लातूर |
टोमॅटो |
केचअप, जाम, प्यूरी, सॉस, कॅन, टोमॅटो पेस्ट, चटणी, RTE, सूप, इत्यादी. |
|
८. |
अहमदनगर |
दुग्ध व दुग्धजन्य
उत्पादने |
बासुंदी, पनीर, लोणी, चीझ, आईसक्रिम, तूप, लस्सी, श्रीखंड, ताक, पेये, व्हिप, क्रिम, फॅट मिल्क, दही, दूध पावडर, व्हे प्रोटीन, खवा, पेढा, कलाकंद इत्यादी. |
|
९. |
कोल्हापूर, सातारा, परभणी |
गुळ |
गुळ पावडर, ज्युस, यीस्ट, मॉलॅसेस, काकवी, इत्यादी. |
|
१०. |
सांगली |
द्राक्षे |
बेदाणा, ज्युस, व्हिनेगार,
Sweet spreads. इत्यादी |
|
११. |
औरंगाबाद |
मका आधारीत उत्पादने
(स्वीट कॉर्न, पॉपकॉर्न, पशुखाद्य इत्यादी) |
कॉर्न सिरप, पीठ, Flakes, ऑईल, स्टार्च,
Corn Stalk Fiddle, सॉस, पॉपकॉर्न इत्यादी |
|
१२. |
जालना |
मोसंबी |
ज्युस, पल्प,
RTS पेय, सिरप, जाम, जेली, नेक्टर, सायट्रीक सीड, Concentrate, Marmalade इत्यादी |
|
१३. |
बीड |
सिताफळ |
पल्प, जाम, जेली, पावडर, सीड ऑईल, आईसक्रिम, रबडी, बर्फी, ड्राइड स्नॅक्स, ज्युस, इत्यादी. |
|
१४. |
बुलढाणा |
पेरू |
ज्युस, जाम, जेली, पल्प, नेक्टर, टॉफी,
RTS पेय प्यूरी, इत्यादी. |
|
१५. |
उस्मानाबाद, अकोला |
कडधान्य आधारीत
उत्पादने (हरभरा, इत्यादी. मुग, तूर डाळ इ.) |
बेसन पीठ, पापड, नमकीन, फुटाणे, डाळ |
|
१६. |
हिंगोली, नांदेड, वर्धा, यवतमाळ |
मसाला पिक उत्पादने
(हळद, मिरची इत्यादी) |
ड्राईड रायझोम, पावडर, ड्राईड मिरची, Flakes, लोणचे इत्यादी. |
|
१७. |
अमरावती, नागपूर |
संत्रा |
ज्युस, पल्प,
RTS पेय, सिरप, जाम, जेली, नेक्टर, सायट्रीक सीड, Mandarin Concentrate, Marmalade तेल Mandarin
Essential oil, Clementine Oil इत्यादी |
|
18. |
वाशिम |
तेलबिया वर्गिय
उत्पादने (सोयाबिन, जवस, तीळ इ.) |
तेल, टोफू, सोयामिल्क, सोयानट, सोयाचनक, सोया प्रोटिन, सोया सॉस, सोया स्टिक, सोया चिप्स, पीठ इत्यादी. |
|
१९. |
भंडारा, गोंदिया, चंद्रपूर |
भात आधारित पिके
(पोहे, मुरमुरे इ.) |
पोहा, मुरमुरे, पीठ, पापड, ऑईल,
Parboiled, Rice, Flakes इत्यादी. |
|
२०. |
गडचिरोली |
किरकोळ वन उत्पादने
(महुवा, मध, हिरडा, |
हिरडा पावडर, महुआ तेल / पावडर /
केक / बिस्कीट / कुकीज / लोणचे / इत्यादी. मशरुम- सुकवलेले मशरूम / बिस्कीट /
कुकीज बेहडा इ. |
आर्ज करण्याची पध्दत

No comments:
Post a Comment